स्वप्नात एकदा मी देवाला विचारलं...
नशिबाचं पुस्तक तूच का लिहायचं?
मी पान उलगडायचं, अन जगानं ते वाचायचं,
पानंच संपत आल्यावर... पुस्तक तूच बंद करायचं,
जगाच्या मोठया पसा-यातून एकटं नेऊन जाळायचं !!
देवाचं उत्तर...
तुला कुणी सांगीतलयं, फ़क्त पानं उलगडायला,
मी कधी नाही म्हट्लयं ,
माझ पान फ़ाडायला, अन तुझं पान जोडायला?
तुझं नशीब तुझं तुच लिहायचं...
आता तुच ठरवं, नावासहित मरायचं की
नावं माग ठेऊन जगायचं...!!